ब्राम्हण समाजातील तरुणांनी उद्योजक बनुन देशसेवा करा – डी एस कुलकर्णी

भुसावळ ( प्रतिनिधी )-
ब्राम्हण समाजातील तरुणांती उद्योजक बनुन देशसेवा करावी असे आवाहन बांधकाम व्यवसायिक व प्रसिद्ध उद्योजक डी एस कुलकर्णी यांनी केले .
ते ब्राह्मण संघ भुसावळच्या शताब्दीपूर्ती निमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात बोलत होते . हा प्रकाशन सोहळा १० मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून, एअर व्हाईस मार्शल (शौर्य पुरस्कार प्राप्त) सूर्यकांत चाफेकर, नगरसेवक ऋग्वेद गंधे तसेच अशोक जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सचिव महेंद्र गोडबोले यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना डी. एस. कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजातील युवकांनी उद्योजक बनून देशसेवेत योगदान द्यावे, असे आवाहन केले. त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासाबद्दल माहिती देत नव्या उमेदीनिशी पुन्हा कामाला सुरुवात केल्याचे सांगितले.
एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याने केलेल्या शौर्यपूर्ण कार्याची माहिती दिली. तसेच दौलतबेग ओल्डी परिसरातील प्रतिकूल परिस्थितीत उभारण्यात आलेल्या धावपट्टीमुळे युद्धकाळात भारतीय सैन्याला मोठी मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले. सैन्यात हिंदू समाजाचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.
समारोप प्रसंगी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश वढवेकर यांनी संघाच्या विविध उपक्रमांची तसेच नियोजित नवीन वास्तूविषयी माहिती देत समाजबांधवांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संघाचे माजी अध्यक्ष संजय जोशी, प्रकाश रिसबूड, विजय जोशी, माजी सचिव प्र. ह. दलाल, प्रकाश पेटारे तसेच अभिलाष नागला, श्रीकृष्ण टेंभूर्णीकर, जयंत जोशी आणि डॉ. रमेश जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
लग्नसराई व कडक उन्हाळा असूनही समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी श्री व सौ. पंकज जोशी यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजन धार्मिक वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष श्री जोशी, कोषाध्यक्ष श्री टेंभूर्णीकर, शंतनू गचके, संजय बोचरे, प्रसन्न गंधे, हेमंत भोकरडोळे, तुषार कुलकर्णी, कल्पना दामले, वैशाली एकलारकर, राजश्री पाठक, विवेक कुलकर्णी, जयंत जोशी आदींनी परिश्रम घेतले. भोजन व्यवस्थेची जबाबदारी आनंद फडके यांनी सांभाळली.