भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत कठोर उपायोजना केली जात आहे याचाच एक अनुभव म्हणून काहूरखेडा व कठोरा खुर्द येथे हे जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी निर्धारित वेळेमध्ये दुकानाच्या बाहेर चौकटी आखून दिलेले आहे या चौकटीमध्ये ग्राहकांनी रांगेतच साहित्य घ्यावयाचे आहे यामुळे शासनाचा सोशल डिस्टन्स हा नियम तंतोतंत पाळला जात आहे तसेच येथील पोलीस पाटील ग्रामसेवक आशा स्वयंसेविका व सरपंच यांच्या मदतीने बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना रुग्णालयात तपासणी केल्यानंतरच गावात प्रवेश दिला जातो तसेच त्यांनी 14 दिवस एकटे राहावे असा सल्ला देऊन त्यांच्यावर ती लक्षसुद्धा सुद्धा दिले जाते यामुळे शहरवासीयांनी या ग्रामीण भागातल्या लोकांचा शहाणपण निश्चित घेतलं पाहिजे अशा प्रकारच्या उपाययोजना वरणगाव नगरपालिकेने वरणगाव शहरात राबवण्यासाठी केल्या पाहिजे, अशी मागणी होत आहे .





