भुसावळ ( प्रतिनिधी )-
भारतातील कोरोना विषाणूंचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी
जिल्ह्याधिकारी यांनी दिनांक 16 मार्च रोजी जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले ही दुकाने 31 मार्च पर्यत बंद राहतील वा पुढील निर्णया पर्यंत बंद राहतील मात्र दिनांक 17 रोजी भुसावळ शहरातील शाळा , महाविद्यालय वगळता मंगळवार रोजी सुद्धाआठवडी बंदअसून सुद्धा काही भागात दुकाने उघडी असल्याचे दिसून आले . जवळपास संपूर्ण मार्केट सुरू ठेवण्यात आले होते.याकरीता खबरदारी व पुढील अनर्थ व धोका टाळण्यासाठी दिनांक 18 मार्चला पालिका प्रशासन पोलीस बंदोबस्तात संपूर्ण मार्केट बंद करणार आहे.
नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी शहर पोलीस स्टेशन व बाजारपेठ पोलीस स्टेशनला जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी पत्र परवानगी मिळण्यासाठी तयार करण्यात आले आहे. दिनांक 18 मार्च रोजी जीवनावश्यक वस्तू वगळता जो ही व्यापारी आदेशांचे उल्लंघन करणार तो भारतीय दंड संहिता 1860(45) च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानून ऱ्याचे विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.यासाठी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासन व पोलिस विभागाने केले आहे .



