भुसावळ (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
शहरातील जीवनावश्यक वस्तू वगळता मॉल, शाळा, महाविद्यालय, उद्यान आदीं बरोबर अनावश्यक गर्दी होणारे दुकान बंद ठेवण्याचे आदेश
जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशनुसार 31 मार्च 2020 पर्यत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे मात्र बाजारपेठ मधील काही दुकाने सुरू असल्याने भुसावळ पालिकेचे अधिकारी शहरात फिरून जीवनावश्यक वस्तू वगळता बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करीत आहे.
जिल्ह्याधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिनांक 16 मार्च रोजी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश 31 मार्च पर्यत लागू केले आहे.जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यास भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानून त्याचे विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.यासाठी भुसावळ पालिकेनचे अधिकारी शहरात फिरत असून दुकादारांना बंद करण्याच्या सूचना देत आहे.या व्यतिरिक्त जर कोणी कायद्यांचे उल्लंघन केल्यास त्यास 5000 रुपये दंड होण्याची शक्यता आहे.आद्यपावतो कुठल्याही व्यापाऱ्यां विरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेले नसल्याची माहिती संजय बनायते,महेश चौधरी न.पा. अधिकारी यांनी दिली.



