भुसावळ
शासनाच्या धोरणानुसार दि . 5 जुर्ले ते 20 जुर्ले यादरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध सुरू असल्याने अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील शिक्षक नाना पाटील सर यांच्या निदर्शनास सदरहू आदिती चव्हाण वय 14 भिरूड हॉस्पिटल च्या मागे आल्याने त्यांनी तिला तिच्या आई-वडिलांना सांगून शाळेत दाखल करण्याविषयी आग्रह केला वरील बाब गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे बालरक्षक संजय गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांना कळविले व दि 19 शुक्रवार रोजी प्रत्यक्ष गटशिक्षणाधिकारी यांनी येऊन आरटीई 2009 च्या कायद्यानुसार व तिच्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार इयत्ता सहावी मध्ये प्रवेश देण्यात आला व त्या विद्यार्थिनीचे बुके देवून स्वागत केले व नवे पुस्तके देऊन तिचा प्रवेश निश्चित करण्यात आला .यावेळी गट शिक्षण अधिकारी यांनी विद्यार्थिनीला मार्गदर्शन करून भविष्यासाठी शुभेच्छा देवून ते पुढे म्हणाले नाना पाटील सर यांचे पर्यावरणावरच नाही तर शाळाबाह्य विद्यार्थी बाल रक्षक म्हणूनही त्यांनी आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून दिलेला आहे मागील आपल्या शाळेतील शाळाबाह्य विद्यार्थिनीने 75% गुण मिळविले होते की आपल्या जिल्ह्यासाठी विशेष बाब ठरली आहे आपण सर्वांनी अशा मुला मुलींचा शोध घेऊन शाळाबाह्य कोणी राहू नये यासाठी प्रयत्न करावा अहिल्यादेवी कन्या विद्यालय नामांकित असल्या शाळेत शाळाबाह्य विद्यार्थिनींना प्रवेश देणे हे अभिमानाची बाब आहे अशा विद्यार्थ्यांना घडून शिक्षणाचा प्रवाहात आणण्याचे कार्य नाना पाटील सर व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग करत आहे हे विशेष आहे .सदरहू विद्यार्थीनीला पुढे काय करायचे विचारले असता मला डॉक्टर व्हायचे आहे असे तिने सांगितले .यावेळी त्यांनी शाळेतील विविध उपक्रमांचा आढावा सुद्धा घेतला .
सदर विद्यार्थी च्या आईला आपल्या मुलीला शाळेत प्रवेश मिळाला म्हणून खूप आनंद झाला व डोळ्यातून आनंदाश्रू येत होते त्यांनीही या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळावा इच्छा होती ती पूर्ण झाली म्हणून त्यांनी शाळेला धन्यवाद दिले . शाळाबाह्य कोणी राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न असतो ज्या भागात विद्यार्थी राहत असतो त्या भागात तील शाळेत नाव दाखल करण्याचा प्रयत्न असतो मागील दोन-तीन वर्षात टेमानी कन्या विद्यालय मनोज माहेश्वरी यांच्याशी शाळेत शाळाबाह्य विद्यार्थिनींना प्रवेश मिळून दिला होता .अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण प्रवाहात आणण्याचेही कार्य सुरू असते असे नाना पाटील सर यांनी सांगितले .
यावेळी गटशिक्षण अधिकारी किशोर वायकोळे बाल रक्षक संजय गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी शाळेचे पर्यवेक्षक संजीव पाटील ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील सर वर्ग शिक्षिका नयना पाटील पालक सतकोर चव्हाण व विद्यार्थिनी अदिती चव्हाण उपस्थित होते



