भुसावळ( प्रतिनिधी) नागरीकत्व दुरूस्ती कायदा लागू करू नये यासाठी मोटरसायकलीने जनजागृती करणारा पुणे येथील अवलियाने मंगळवार ३ रोजी भुसावळ येथील संविधान बचाव समितीतर्फे तहसील कार्यालयाजवळ ४१ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट दिली.
पुणे येथील रहिवासी अस्लम इसाक बागवान हे सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात देशभरात जनजागृती करण्यासाठी बाईकवर फिरत आहे. केंद्र सरकार हे लोकांची फसवणूक करीत आहे .जनतेला खरी माहिती देण्यासाठी सुमारे तीन हजार किलो मीटर पर्यंत फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.आता पर्यंत त्यांनी सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, मिरज , कुपवाड, सोलापूर, पंढरपूर, उस्मानाबाद, बिड आदी शहरांत जनजागृती करून आज भुसावळ येथे साखळी उपोषणाला भेट दिली. स्वराज्य अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी सुरू केलेल्या “हम भारत के लोग ” या चळवळीचा भाग म्हणून ३२ दिवस प्रवास करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे . पुणे ते दिल्ली असा प्रवास करून हा अवलिया १९ मार्चला दिल्ली येथे पोहचणार आहे.




