वरणगाव – मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सरसकट समावेश करण्यासाठी “सगेसोयरे” या शब्दाच्या व्याख्येबाबत शासनाने जो नियमांचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा नियमबाह्य आणि घटनाबाह्य असल्याने त्या मसुद्याला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने… दि. १ फेब्रुवारी, गुरुवारी दुपारी ११ वाजता (भुसावळ तहसील कार्यालय) येथे सर्व ओबीसी घटकातील बांधवांनी निवेदन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे,

माळी, वंजारी, लेवा, साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, खाटीक, बागवान, अन्सारी, गवळी, कुरेशी, पिंजारी, शाहा यासह अनेक ओबीसी घटकांमध्ये येणाऱ्या समाज बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येते की, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सरसकट समावेश करण्यासाठी “सगेसोयरे” या शब्दाच्या व्याख्येबाबत शासनाने जो नियमांचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा नियमबाह्य आणि घटनाबाह्य असल्याने त्या मसुद्याला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने…
उद्या दि. १ फेब्रुवारी, गुरुवारी दुपारी ११ वाजता (भुसावळ तहसील कार्यालय) येथे सर्व ओबीसी घटकातील बांधवांनी निवेदन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे,
आपण आपल्या शैक्षणिक व राजकीय भवितव्यासाठी व आपल्या हक्काचे मिळालेले आरक्षण टिकविण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहनकर्ते..अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी यांनी केले आहे .


