भुसावळ – इतिहासात डोकं पाहिल्यास प्रत्येक राजाच्या रथाचा चालक महत्त्वाचा एक पद होते तसेच दळणवळणाच्या दृष्टिकोनातून रेल्वेचे संपूर्ण देशात जाळे असले तरी ग्रामीण भागाची नाळ जोडणारा दुवा म्हणजे राज्य परिवहन महामंडळ आहे मंडळाच्या बसच्या माध्यमातून विविध सवलती सर्वसामान्यांपर्यंत मिळत असल्या तरी या मंडळाला चालवणारा एक भाग म्हणजे चालक असल्याचे प्रतिपादन सुनील वानखेडे यांनी केले
24 जानेवारी हा चालक दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने भुसावळ आगारातील चालकांचा गौरव करण्यासाठी भुसावळ आगारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक सुनील वानखेडे आगार प्रमुख राकेश शिवदे स्थानक प्रमुख प्रकाश भोई सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सागर देवकर वाहतूक नियंत्रक सुरज पवार चालक एस ओ लोखंडे के एस इंगळे बी डी साळुंखे एस आर अटक आदि उपस्थित होते
यावेळी सुनील वानखेडे बोलताना म्हणाले की लांब पल्ल्याचा प्रवास वाहनांमुळे कमी वेळेत कापला जातो यासाठी वाहनांची सुविधा झालेली आहे परिवहन महामंडळाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सवलती मिळतात प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे आता चालक क्षेत्रात देखील महिलांनी भरारी घेतली असून भुसावळ आगारात तीन महिला बस चालक म्हणून काम करीत आहे चालकाच्या हातामध्ये बसमधील साठ प्रवाशांची सुरक्षितता असते प्रत्येक चालक काळजीपूर्वक आपले वाहन चालून इच्छित स्थळी प्रवाशांना पोहोचवण्याचे काम करीत असतात चालकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 24 जानेवारी हा चालक दिन साजरा केला जातो

डिझेल कपातीवर विचार केला पाहिजे
राष्ट्रीय संपत्ती डिझेल आहे महामंडळाचा सर्वात जास्त खर्च हा डिझेलवर होत असतो या डिझेलची कपात कशी करता येईल यासाठी चालकाने विचार केल्यास निश्चितपणे कमी डिझेलमध्ये जास्त वाहन अंतर कापेल जाऊ शकते यामुळे महामंडळासोबतच आपण खनिज तेलाची बचत देखील करू शकतो
राकेश शिवदे आगार प्रमुख


