नागपूर मुंबई रेल्वे सेवा अखेर ९ तासानंतर पूर्ववत सुरू


भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर आणि मानकूर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान १० जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुले ठप्प झालेली नागपूर मुंबई रेल्वे सेवा अखेर ९ तासानंतर पूर्ववत सुरू झाली असल्याचे रेल्वे सूत्रांनी कळविले .
रुळा नजीक नाल्याचे बांधकाम सुरू होते काल झालेल्या पावसामुळं नाल्याला पूर आला व रुळाखालची वाळू वाहून गेल्याने या पावसाचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला होता . नागपूर मुंबई तब्बल १२ गाड्या थांबविण्यात आल्या होत्या .
नागपूर रेल्वे स्थानकावरही काही गाड्या थांबविण्यात आल्या त्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले होते .
दरम्यान प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने त्वरित युद्ध पातळीवर काम सुरु केले . अखेर ९ तासानंतर नागपूर मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली असल्याचे रेल्वे सूत्रांनी कळविले
पहिली गाडी ३ वाजून ४० मिनिटांनी सुटली त्यानंतर विस्कळीत रेल्वे वाहतूक सेवा ९ तासानंतर पूर्ववत झाली .