भुसावळ – नविन वर्षा निमित्त प्लास्टीक बंद करण्यासाठी येथील महिला पर्यावरण संखी मंचने नविन वर्षाचा संकल्प घेतला असून आगळा वेगळया पद्धतीने साजरा गुढी पाडवा साजरा केला . यानिमित्त शहरात शोभायात्रा काढून ठिकठिकाणी पथनाट्य सादर करित पर्यावरण वाचविन्यासाठी संदेश दिला . पर्यावरण ग्रुपने शनिवार रोजी संध्याकाळी 5 वाजता विकास कॉलनी भागात गुढीपाडव्या निमित्ताने शोभायात्रेचे आयोजन केले होते . यावेळी “प्लास्टीक वापर बंद करा , पर्यावरणारचे संरक्षण करा”व “नका करू अंगण तुझं न माझं,पर्यावरण आहे सगळ्यांचं “अशा घोषणा देत व ठिकठिकाणी पर्यावरण कसे वाचवले पाहिजे , घरापासुन स्वच्छते करीता कशी सुरूवात केली पाहिजे यासाठी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. तसेच महिलांना एक कापडी पिशवी व संकल्प पत्रक वाटले. पर्यावरण तालुकाध्यक्ष राजश्री बादशहा यांनी सुरूवातीला उपस्थित सगळ्यां महिलां कडुन प्रतिज्ञा करून घेतली .
यावेळी संघटनेच्या उपाध्यक्ष मंदाकीनी केदारे,रूपाली पाटणकर,मीना राजपुत,वर्षा लोखंडे,अंजली वाघमारे ,भारती प्रजापती,सुरेखा पाटील,विशाखा पाटील,रेखा तायडे,प्रतिभा पाटील,उषा मोरे,प्रणिता देशपांडे, मानसी देशपांडे आदीं महिलांचा मोठ्या संख्यने सहभाग होता
.महानंदा पाटील व शैला सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले . तसेच भारती प्रजापती यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनी आयुर्वेदिक रोप देवुन साजरा केला. असे प्रसिद्धि प्रमुख उज्वला बागुल यांनी कळविले .



