भुसावळ प्रतिनिधी – तरुण पिढीत साकारात्मक विचार रुजविणे महत्वाचे असून मोबाईल मुळे अकृत्रिम संवाद होत आहे . व्यक्ति – व्यक्तितील संवाद साधण्यासाठी व्यक्तिंचा भावनांचा विचार करून संवाद साधणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पी.के . कोटेचा महिला महाविघालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. गिरीष कोळी यांनी व्यक्त केले . येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या मानव्यविद्या शाखेतंर्गत हिंदी विभागातर्फे आयोजीत केलेल्या संवाद कौशल या विषयावर ते बोलत होते . महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए.डी.गोस्वामी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते . डॉ.गिरीश कोळी पुढे म्हणाले समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी भाषेचा उपयोग करतो .मात्र उत्कृष्ठ संवाद कौशल्य प्रत्येकानं मध्येच असेल असे नाही . यासाठी आवाजातील चढ-उतार, देहबोली ,शब्द फेक, भाषा यांच्या माध्यमातून उत्कृष्ट संवाद साधता येतो .उत्कृष्ट संवाद आजच्या पिढीमध्ये दिसत नाही .उत्कृष्ट संवाद रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक चर्चा व संवाद होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले . अध्यक्षस्थानावरून प्रा. डॉ . ए.डी. गोस्वामी म्हणाले की भाषा मुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील भावना इतरांपर्यंत पोहोचवितो . भाषा आणि संवाद एकच नाण्याच्या दोन बाजू असून संवादातून सकारात्मकता येते . पॉझिटिव्ह थिंकिंग हे संवादाची उत्कृष्ट उदाहरण असल्याचे दाखले त्यांनी दिले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा . डॉ .मनोज पाटील यांनी केले .तर सूत्रसंचालन प्रा . डॉ . राजेंद्र तायडे यांनी केले . यावेळी मराठी विभाग प्रमुख के .के .अहिरे प्रा . डॉ . जे . एफ .पाटील प्रा . एस .टी .धूम प्रा . डॉ .प्रफुल्ल इंगोले , प्रा . डॉ . डी . एन टेकाडे, डॉ. आर.एस. नाडेकर,प्रा. भूपेंद्र बनाईत, प्रा पुरुषोत्तम महाजन, डॉ. दिनानाथ पाठक , प्रा वंदना नेमाडे, डॉ. स्वाती महाजन, प्रा डॉ. प्रियंका महाजन, प्रा. उज्वला महाजन, प्रा. डॉ. ललीत तायडे, प्रा. श्रीपाद वाणी, प्रा. डॉ.किरण वारके उपस्थित होते . प्रा कविता पांडव यांनी आभार मानले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. एम . व्ही . वायकोळे उपप्राचार्य डॉ. एन.ई . भंगाळे, डॉ. बी .एच. बऱ्हाटे डॉ . एस व्ही पाटील यांनी परिश्रम घेतले .



