संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य आपल्या सर्वांचे – दिलीप सूर्यवंशी ;

भुसावळ -विभक्त कुटुंब पद्धती एकलकोंडा पणा व सोशल मीडिया मुळे मुलांवरती चुकीचे संस्कार घडत आहे आई-वडील दोघेही नोकरीला असल्याने चांगल्या संस्कारांची रुजवण होत नाही आपण आपल्या जीवनामध्ये पैसा भरपूर कमावतो परंतु ज्यांच्यासाठी आपण हे अर्थार्जन करत आहोत तीच पिढी चुकीच्या मार्गाने जात असेल तर या पैशाचा उपयोग नाही याकरिता दोघांपैकी एकाने आपल्या मुलांवर लक्ष केंद्रित केले आहे त्यांच्यावर ती चांगल्या संस्कारांची रुजवण केली पाहिजे यामुळेच भविष्यातील एक सुजाण नागरिक घडू शकत असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त दिलीप सूर्यवंशी यांनी केले

गुरुवारी सायंकाळी भुसावळातील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहामध्ये एमटीएस परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता या वेळी अध्यक्षस्थानी एमटीएस परीक्षेचे संचालक सुभाष महाजन होते या कार्यक्रमाला बाल रोग तज्ञ डॉ पंकज राणे रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली चे अध्यक्ष डॉ संजू भटकर सोसायटीचे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे नूतन प्राथमिक शिक्षण सोसायटीचे संचालक अध्यक्ष प्रदीप सोनवणे विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे आदी उपस्थित होते

यावेळी बोलताना योगेश इंगळे म्हणाले की स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी बालपणापासून स्पर्धापरीक्षांची रुजवण झाली पाहिजे बौद्धिक कौशल्य वाढवणरे व आव्हानात्मक प्रश्‍न सोडवणे सवय मुलांना जडली पाहिजे एमटीएस परीक्षा मुळे स्कॉलरशिप परीक्षेत यश तर मिळतेच परंतु उच्च शिक्षणानंतर देखील स्पर्धा परीक्षेत यश मिळत असल्याचे सांगितले 

अध्यक्षीय भाषणात सुभाष महाजन म्हणाले की इयत्ता पाचवी व आठवी या दोन वर्गांना स्कॉलरशिप परीक्षा आहे या परीक्षेची तयारी इयत्ता दुसरी पासून विद्यार्थी करतात परीक्षेतील प्रश्न सोडवण्याची सवय या माध्यमातून विद्यार्थ्यांना जडते व स्कॉलरशिप परीक्षेचे सहजगत्या उत्तीर्ण होऊन पुढील एमटीएस एनटीएस परीक्षा मध्ये यश मिळते विद्यार्थ्यांमध्ये वाचना सोबतच आव्हाने स्वीकारण्याचे कसब निर्माण होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जीवन महाजन यांनी केले

या विद्यार्थ्यांचा झाला गौरव

राज्यस्तरावरील गुणवत्ताधारक विद्यार्थी 

रिधिमा समीर चौधरी, आर्या राहुल बारजीभे, रुचिता अतुल बारजीभे, दर्शना किशोर पाटील, कुश महेंद्र चौधरी, प्रथमेश जगदीश पाठक. 

केंद्रस्तरावर गुणवत्ताधारक विद्यार्थी

प्रिशा विशाल बजाज, सान्वि विजय चौधरी, अद्वेत चेतन पाटील, क्षीतिज देवेंद्र भारंबे, अन्वि सुधीर भोळे, विष्णू कुंदन चौधरी, रुद्र अतुल बारजिभे