भुसावळ (प्रतिनिधी )-
8 डिसेंबर रोजी सर्व शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला भुसावळ
कृषि उत्पन्न बाजार समितीने शंभर टक्के पाठिंबा दिला आहे .शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला भुसावळ कृषि उत्पन्न बाजार समिती पाठिबा देत असून 8 रोजी भुसावळ कृषि उत्पन्न बाजार समितीतील सर्व प्रकारचे लिलाव व त्याच्याशी संबंधीत असलेले सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.असे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरीं यांनी कळविले आहे .
सर्व अन्न-धान्य तसेच भाजीपाला उत्पादक शेतकरी, अडत, खरेदीदार व्यापारी,
सर्व बाजार घटक तसेच सर्व हमाल, मापाडी बांधवांना सूचित करण्यात येते की,
केंद्र शासनाने कृषि विषयक तिन कायदे पारीत केलेले आहे त्यास देशातील विविध अश्या ५०० शेतकरी संघटनांनी विरोध दर्शविलेला असून केद्र शासनाने
तिनही कायदे रद्द व्हावे म्हणून देशाची राजधानी दिल्ली येथे मोठया प्रमाणावर
आंदोलन सुरु केलेले असून त्यात देशभरातील हजारो शेतकरी सक्रीय सहभागी
आहेत व सदर कायदयास विरोध म्हणून सर्व शेतकरी संघटनांनी दि. ८/१२/२०२०
रोजी भारत बंद पुकारलेला आहे व त्यास महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुणे या महाराष्ट्रातील कार्यरत बाजार समित्यांच्या शीखर संस्थेने सक्रीय पांठीबा
जाहीर केलेला आहे. सबब शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला भुसावळ
कृषि उत्पन्न बाजार समिती पाठिबा देत असून दि.८/१२/२०२० रोजी भुसावळ कृषि उत्पन्न बाजार समितीतील सर्व प्रकारचे लिलाव व त्याच्याशी संबंधीत असलेले सर्व
व्यवहार बंद असणार आहेत.



