हाजी अज़िज़ उर्दू गर्ल्स हायस्कूलचा दहावीचा उल्लेखनीय निकाल:

भुसावळ (प्रतिनिधी) — हाजी अज़िज़ उर्दू गर्ल्स हायस्कूल, भुसावळचा इयत्ता 10 वीचा निकाल 83.92 टक्के लागला असून विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

शाळेत प्रथम क्रमांक रहेमत बी शाहिर मनियार हिने 82.20 टक्के गुण मिळवून पटकावला. द्वितीय क्रमांक तन्ज़ीला ज़ोया नुरमोहम्मद हिने 75.40 टक्के गुणांसह मिळविला, तर तृतीय क्रमांक हुमेरा फातेमा अशरफ खान पिंजारी हिने 74.80 टक्के गुण मिळवून संपादन केला.

यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.