जळगाव (प्रतिनिधी ) :- राज्यस्तरीय सिक्स ए साईड इंडोअर हॉकी क्रीडा स्पर्धा महाराष्ट्र सिक्स ए साईड इंडोअर हॉकी संघटना व जळगाव जिल्हा सिक्स ए साईड इंडोअर हॉकी असोसिएशनतर्फे दिनांक १ मे ते ३ मे २०२६ दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव आणि रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव (महाराष्ट्र) येथे झाल्या. सदर स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रतून मुले व मुली मिळून ३०० खेळाडू जळगाव नगरीत सहभागी झालेले होते.

सदर बक्षीस वितरण प्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे हस्ते जनरल विजेतेपद देण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूलचे ऑब्ज़र्वर संतोष प्रधान सर, महाराष्ट्र सिक्स ए साईड इंडोअर हॉकी संघटनेचे सचिव अश्पाक शेख, विकास शेडके, जिल्हा सचिव डॉ. आसिफ खान, जळगाव जिल्हा हौशी ज्यूदो असोसिएशनचे सचिव तथा क्रीडा संचालक डॉ.उमेश पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.या स्पर्धेत जनरल चॅम्पीअनशिप मध्ये पुरुष प्रथम-विजयी जळगाव मनपा संघ उपविजीय जळगाव जिल्हा संघ तसेच तृतीय- नाशिक
महिलामध्ये प्रथम- नागपुर संघ
द्वितीय-यवतमाल
तृतीय- चंद्रपूर
स्पर्धेला आयोजन म्हणून महाराष्ट्र व जळगाव सिक्स ए साईड इंडोअर हॉकी यांनी सहकार्य लाभले.
स्पर्धेला मुख्य पंच म्हणून लाभले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी आसीफ खान , सहसचिव डॉ. उमेश पाटील, याकूब शेख, अकबर खान, आरिफ़ शेख, अख़्तर खान, शेख शाहिद, ज़हीर ख़ान, वासिम अहमद, शेख जावेद, योगेश महाजन, डॉ. चांद खान, महेश पाटील, अतुल गोरडे, अजय काशीद, डिगंबर महाजन, सचिन वाघ, प्रा. सुभाष वानखेडे, अशफाक शेख, देवेंद्र सुर्यवंशी, मयूर पाटील, दिनेश चौधरी आदींनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन आसीफ खान तर आभार उमेश पाटील यांनी मानले.


