भुसावळ अग्निकांड प्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांची मदतीची धाव : पीडितांना दिलासा :

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील पापनगर काझी प्लॉट भागात घडलेल्या भीषण अग्निकांडानंतर माजी आमदार संतोष चौधरी यांनी आगग्रस्त पीडित कुटुंबांची भेट घेऊन विचारपूस केली. या कठीण काळात त्यांनी मानवतेचा आदर्श ठेवत गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला.

यावेळी पीडितांना कपड्यांचे वाटप करून, त्यांचे घरांच्या छपरासाठी पत्रे (टिन शीट्स) देण्यात आली. तसेच
दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी गॅस सिलेंडर देखील उपलब्ध करून देण्यात आले.

या उपक्रमामुळे पीडित कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर नव्या आशेची किरण दिसून आली.

“मानव सेवा हीच सर्वोत्तम सेवा” या विचाराने माजी आमदार संतोष चौधरी सातत्याने लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.