भुसावळ येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी) – सर्व महापुरुष व महानायिका यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त स्वतेज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, भुसावळ यांच्या वतीने आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रम व सत्कार समारंभ शंभुराजे चौक, डी.एल. हिंदी हायस्कूल मागे, येथे उत्साहात व मोठ्या दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक, अधिकारी शिक्षक, विद्यार्थी व समाजहितचिंतकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात शिक्षण, सामाजिक कार्य, सांस्कृतिक व दिव्यांग सेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्यपाल महाराज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुस्तकं, पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला.

सत्कारमूर्तींमध्ये गेल्या दीडशे वर्षापासून भुसावळ शहरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या सोसायटी ऑफ अवर लेडी ऑफ फातिमा, भुसावळ. या संस्थेच्या सन्माननीय चेअरमन मा. सिस्टर ॲग्नेस लोपस, (सेंट अलॉयसिस हायस्कूल, भुसावळ), याच सेंट अलॉयसिस स्कूल च्या मुख्याध्यापिका, मा. सिस्टर शीला सायमन, तसेच अनेक विद्यार्थ्यांची खेळामध्ये गोडी वाढवून स्पोर्ट्स कोट्यातून त्यांना नोकरीपर्यंत पोहोचवणारे बी. झेड. उर्दू हायस्कूल, भुसावळ, चे माजी मुख्याध्यापक, श्री. मोहम्मद आबिद मोहम्मद जाहिद, दिव्यांग बांधवांसाठी काम करणारे दिव्यांग फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. शेख अकबर शेख अहमद,
भुसावळ मधील नाट्य चळवळीला बळ देणारे उत्कर्ष कलाविष्कार चे
श्री. अनिल कोष्टी, भुसावळ मधील अनेक विद्यार्थ्यांना गणित हा विषय सोपा करून सांगणारे मॅथ लाईफ अकॅडमी चे श्री. जितेंद्र पाटील,
तसेच पु. ओ. नाहाटा महाविद्यालयातील भूगोल भूगोल विभाग प्रमुख आणि मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचे सचिव प्रा. डॉ. अनिल जगन हिवाळे, यांचा समावेश होता.

सत्कारमूर्तींनी आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत शिक्षण, सामाजिक जाणीवा व सेवाभाव यांचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा सन्मान केला.

कार्यक्रमादरम्यान प्रबोधनपर विचार मांडण्यात आले. समाजात बंधुभाव, एकात्मता, शिक्षणाचे महत्त्व, तसेच सामाजिक बांधिलकी यांवर मार्गदर्शन करण्यात आले. या विचारांनी उपस्थितांना प्रेरणा व दिशा मिळाली.

स्वतेज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेतर्फे कार्यक्रमाचे नियोजन सुबक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. आयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी केलेल्या परिश्रमांमुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वतेज सामाजिक विकास संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.