भुसावळ (प्रतिनिधी) -: सर्व हिंदू बांधव, गोसेवक आणि गोप्रेमी यांना कळविण्यात येते की, सोमवार दि. २७ एप्रिल २०२६ रोजी ‘गो सन्मान दिवस’ निमित्त देशभरात ‘गो सन्मान आवाहन अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने भुसावळ येथेही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी सर्वांनी सकाळी नेमके १० वाजता श्री श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान, भुसावळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीने मा. तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गो सेवा, सुरक्षा, सन्मान
भुसावळ येथील आयोजकांनी केले आहे.


