भुसावळातील भाजपा उमेदवार मेघा वाणी यांनी केले न्यायालयात रिट दाखल : उद्यापर्यंत निकाल अपेक्षित –

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग 11 ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मेघा वाणी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुध्द न्यायालयात अपिल दाखल केले आहे. त्या अपिलावर 25 नोव्हेंबरपर्यत निर्णय येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली

हरकत फेटाळल्याने न्यायालयात धाव
प्रभाग 11 ब मध्ये भावना अजय पाटील यांनी दाखल केल्या उमेदवारी अर्जावर मेघा वाणी यांनी हरकत घेत पाटील यांच्या उमेदवारी अर्जातील काही जागा रिक्त सोडलेल्या आहे, अशी हरकत घेतली आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी ही हरकत फेटाळून लावत पाटील यांनी प्रत्येक कागदावर सही केलेल्या आहे, असे सांगितले.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाच्याविरूध्द वाणी यांनी न्यायालयात धाव घेत अपिल दाखल केले आहे. या अपीलावर 25 नोव्हेंबरपर्यत निर्णय होणे अपेक्षित आहे कारण 25 नोव्हेंबर रोजी अपिलात गेलेल्यांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतीम मुदत आहे त्यामुळे या निर्णयाकडे राजकीय मंडळींसह मतदारांचे लक्ष लागले आहे.