भुसावळ : ‘मजहब नही सिखाता आपस में बैर रखना’ या उर्दू कवी अलामा इक्बाल यांच्या ओवीशी अनुरूप कार्य भुसावळातील माजी नगरसेवक साबीर शेख गेल्या २५ वर्षांपासून निभावत आले आहेत. देशभरात आज सर्वत्र रक्षाबंधनांचा सण उत्साहात पार पडला.ठिकठिकाणी भावाने बहिणीच्या रक्षणाच्या जवाबदारी स्वीकारत राखी बांधली. भुसावळ शहरातदेखील हा सोहळा देखील सर्व धर्मात समाजासह धर्मात घरोघरी अत्यंत आनंदात पार पडला.
या रक्षाबंधन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू बहिणीने गेल्या २५ वर्षापासून मुस्लीम भावाला राखी बांधून जातीय सलोखा जपला.
भुसावळ शहरातील हिंदू-मुस्लीम एकता मंचच्या अध्यक्षा सुमन वरड या सुमारे २५ वर्षांपासून माजी नगरसेवक साबीर शेख यांना राखी बांधत आल्या आहेत. वरड यांच्या भावाचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. यावेळी साबीर शेख यांनी त्यांना धीर देत भाऊ गेला असलातरी दुसरा भाऊ पाठीराखा असल्याचे म्हणत रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यास सुरूवात केली. गेल्या २५ वर्षांपासून साबीर शेख हे राखी बांधत आले आहेत. भुसावळातील ऐक्याच्या रक्षाबंधनाचे सर्व समाजमनातून कौतुक होत आहे.

जिस किसी हिंदू बहन का भाई नहीं है तो हाजीर है मेरी कलाई, असा संदेश देत हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी जातीय सलोख्यासाठी प्रार्थना केली .
यानिमित्ताने माजी नगरसेवक साबीर शेख यांनी या माध्यमातून दिला आहे. देशात ऐक्य नांदावे, शांतता रहावी, मुस्लीम एकोपा टिकून रहावा, अशी प्रार्थनाही त्यांनी यानिमित्ताने या दिवशी केली.


