वरणगाव (प्रतिनिधी )-

स्वच्छ भारत अभियाच्या 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत वरणगाव शहरात तीन ठिकाणी मॉडेल शौचालयाची निर्मिती करण्यात आली या शौचालयांमध्ये वीज व पाणी पुरवठा नसल्याने या ठिकाणी वापर होत नाही परिणामी या शौचालयाची नाजूक होत असून पालखीच्या मालमत्ते चे नुकसान होता है याठिकाणी पाणीपुरवठा व वीजपुरवठा करून नागरिकांसाठी वापरासाठी खुले करावे अशा प्रकारची मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली आहे
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सिद्देश्वर नगर , आक्सा नगर, रावजी बुवा येथे प्रत्येकी 68 लक्ष रुपयाचे सार्वजनिक शौचालय बांधले मात्र पाणी लाईट उपलब्ध नसल्याने तेथील जनतेला सार्वजनिक शौचालयाचा लाभ मिळत नाही परिणामतः सिद्देशवरनगर येथील 68 लक्ष रुपयाच्या शौचालयाची दारे शौचालय ची भांडी स्टाईल चे नुकसान करण्यात आले असून पालिकेच्या या मालमत्तेचे नुकसान अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षते मुळे होत आहे आज सार्वजनिक शौचालय बांधून पूर्ण झाले या ठिकाणी पाणी आणि लाईट लावणे बंधनकारक असतांना तिथे लावले गेले नसल्याने पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान दुर्लक्ष भूमिके मुळे झाले आहे झालेल्या नुकसानाची चौकशी करून जे कोणीही जबाबदर असतील त्यांची चौकशी करून तात्काळ कार्यवाही करावी तसेच मोड तोड झालेल्या सार्वजनिक शौचालयाची तात्काळ दुरुस्ती करण्यात येऊन सिद्देशवरनगर , आक्सानगर , रावजी बुवा येथील सार्वजनिक शौचालया ला पाणी पुरवठा व लाईट फिटिंग तात्काळ करून जनते साठी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे माजी उपनगराध्यक्ष शेख आखलाख शेख युसूफ माजी नगरसेविका माला मेढे मेहनाज इरफान पिंजारी यांनी प्रशासक व मुख्यधिकारी यांच्या कडे केली आहे निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांनासुद्धा, पाठवली आहे


