सुनसगाव येथे पिरामल स्वास्थ्य संस्थेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी


भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतातील प्राथमिक आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मोफत कार्य करणाऱ्या पिरामल स्वास्थ्य तर्फे ‘ सेहत ओके प्लिज ‘ या प्रोजेक्ट अंतर्गत भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे ५ मे रोजी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार देण्यात आले .
पिरामल स्वास्थ्य ही भारतात प्राथमिक आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मोफत वैद्यकीय कार्य करीत आहे .ही संस्था मधुमेह, रक्तदाब, हायपर टेन्शन तसेच असंसर्गजन्य आजारांवर लक्ष केंद्रित करून संस्थेच्या माध्यमातून ‘ सेहत ओके प्लिज ‘ ही संकल्पना तयार केली असून गावोगावी जाऊन आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते आहे. ही संस्था धरणगाव , एरंडोल ,यावल , जळगाव, भुसावळ या तालुक्यातील गावांमध्ये आरोग्य तपासणी व औषधोपचार करीत आहेत. विशेष म्हणजे सुनसगाव येथे गेल्या तीन चार महिन्यांपासून ४ / ५ तारखेला शिबिराचे आयोजन करण्यात येते व नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते आहे. हे शिबिर
प्रोजेक्ट समन्वयक प्रदिप रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एमएमयू – २ चे कर्मचारी जीएनएम रोशनी पेंदाम , एएनएम मंगल चौरे , सीएफओ नेहा विलास खरतडे व पायलट ज्ञानेश्वर सपकाळे हे पार पाडत आहेत. सुनसगाव येथे सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र पाटील , विकासो चेअरमन सुजित पाटील, भोजराज कोळी , महेश भोळे , कमलाकर शिंदे , पत्रकार जितेंद्र काटे व नागरीकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.