मध्य रेल्वेची मोठी घोषणा: मुंबई – पुणे–गोरखपूर दरम्यान २४८ उन्हाळी विशेष गाड्या

भुसावळ (प्रतिनिधी) प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ने मुंबई/पुणे ते गोरखपूर दरम्यान तब्बल २४८ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या विशेष शुल्कासह धावणार असून
या निर्णयामुळे मुंबई, पुणे आणि उत्तर प्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे.

1) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर दैनिक विशेष (१२४ सेवा)

गाडी क्र. 01079:
१५ मे ते १५ जुलै २०२६ दरम्यान दररोज रात्री १०:३० वाजता सुटणार
→ तिसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता गोरखपूर येथे आगमन

गाडी क्र. 01080:
१७ मे ते १७ जुलै २०२६ दरम्यान गोरखपूरहून दुपारी २:३० वाजता सुटणार
→ तिसऱ्या दिवशी रात्री १२:४० वाजता CSMT येथे आगमन

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, झाशी, कानपूर, लखनऊ, गोंडा, बस्ती आदी प्रमुख स्थानके

डबे संरचना:
AC 2-tier, AC 3-tier, स्लीपर, जनरल आणि गार्ड व्हॅन

2) पुणे – गोरखपूर – हडपसर दैनिक विशेष (१२४ सेवा)

गाडी क्र. 01415:
१५ मे ते १५ जुलै २०२६ दरम्यान दररोज सकाळी ६:५० वाजता पुण्याहून सुटणार
→ दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४:०० वाजता गोरखपूर येथे आगमन

गाडी क्र. 01426:
१६ मे ते १६ जुलै २०२६ दरम्यान गोरखपूरहून सायंकाळी ५:३० वाजता सुटणार
→ तिसऱ्या दिवशी पहाटे ३:१५ वाजता हडपसर येथे आगमन

थांबे: दौंड, नगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, झाशी, कानपूर, लखनऊ, गोंडा, बस्ती

डबे संरचना:
AC 2-tier, AC 3-tier, स्लीपर, जनरल आणि गार्ड व्हॅन

आरक्षण माहिती

बुकिंग सुरू: २६ एप्रिल २०२६

आरक्षण केंद्रे आणि IRCTC वेबसाइटवर उपलब्ध , अनारक्षित डब्यांसाठी UTS प्रणालीद्वारे तिकीट , RailOne ॲपवरही बुकिंग सुविधा
अधिक माहिती

सविस्तर वेळापत्रकासाठी NTES ॲप किंवा अधिकृत रेल्वे संकेतस्थळाला भेट द्या.