भुसावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भुसावळ तालुका पूर्वमध्ये दि. ६ एप्रिल २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यानिमित्त कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता वरणगाव येथील भाजपा कार्यालयात होणार आहे. यावेळी दिवंगत नेते नारायण दादा पाटील, सुधीर कोल्हे तसेच इतर मान्यवरांच्या प्रतिमांचे अनावरण करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

यानंतर सकाळी १० वाजता तिरंगा सर्कल, वरणगाव येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार असून पक्षासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

दुपारी ४ वाजता नामदार संजय सावकारे यांच्या कार्यालयात जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पक्षाच्या आगामी वाटचालीवर चर्चा होणार असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

कार्यक्रम प्रमुख अजय रमेश पाटील, तालुकाध्यक्ष प्रशांत प्रभाकर पाटील, सरचिटणीस तुषार पाटील, विजय तायडे तसेच शहराध्यक्ष पप्पू माळी यांनी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.