जळगाव येथे महिलांसाठी मोफत झुंबा फिटनेस वर्कशॉपचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी )- नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी तसेच मानसिक व शारीरिक विकासाला चालना देण्यासाठी सात दिवसीय मोफत झुंबा फिटनेस व बॉलीवूड डान्स वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

हे वर्कशॉप गोल्ड जिम, एम. जे. कॉलेज रोड, जळगाव येथे दिनांक 13 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये सकाळी 8 ते 9 या वेळेत झुंबा, दुपारी 3 ते 4 या वेळेत बॉलीवूड डान्स आणि दुपारी 4 ते 5 या वेळेत पुन्हा झुंबा सत्र असे नियोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेस झुंबा एक्सपर्ट डॉली आनंदकुमार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देत व्यायामाची सवय लावावी आणि व्यक्तिमत्व विकास साधावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

प्रथम नाव नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने इच्छुक महिलांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनिषा पाटील यांनी केले आहे नाव नोंदणीसाठी सौ. मनिषा पाटील – 94206 62093 ,
डॉली आनंद कुमार – 9226577185 या उपक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.