भुसावळ (प्रतिनिधी) : स्वामिनी फाउंडेशन व ताप्ती लेडीज योगा यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र गौरी नवरात्रीनिमित्त नाभिक संघ, भुसावळ येथे विविध स्पर्धा, हळदी-कुंकू समारंभ व मनोरंजनात्मक कार्यक्रम उत्साहात पार पडले. दुपारी 4 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्वामिनी फाउंडेशन अध्यक्ष प्रियंका चौधरी व डॉ. भाग्यश्री भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना एकत्र आणून त्यांच्या कौशल्यांना व व्यक्तिमत्त्वाला वाव देणे हा होता. यानिमित्ताने वेशभूषा स्पर्धा, हरभऱ्याची डाळ व कैरीपासून बनवलेल्या पदार्थांची पाककृती स्पर्धा, विविध मनोरंजनात्मक उपक्रम तसेच लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले.
पाककृती स्पर्धेत आरती देशपांडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर मनीषा सिंग यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. रेखा बटले यांना विशेष पारितोषिक देण्यात आले. वेशभूषा स्पर्धेत साधना मोहरील प्रथम, तर ‘सुया घ्या सुया’ यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. सहभागी महिलांनी पारंपरिक आणि आधुनिक वेशभूषेचे आकर्षक9 सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा सौ रजनी संजय सावकारे होत्या. परीक्षक म्हणून सुनंदा औंधकर व मृणाल गाडगीळ यांनी काम पाहिले. नगरसेविका सोनल महाजन, सौ. छाया देशमुख (फालक), तसेच ताप्ती योगा च्या अध्यक्ष डॉ. भाग्यश्री भंगाळेस्वामिनी ,स्वामिनी प्रियंका चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर महिलांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे सहभागी महिलांना प्रोत्साहन मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया निकम यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजिता वडनेरे यांनी मानले.
लकी ड्रॉमध्ये अस्मिता लोहार (प्रथम), पाटील (द्वितीय) व दिपाली चौधरी (तृतीय) विजेत्या ठरल्या. तसेच मनीषा धांडे, जया इंगळे, अमिता जोशी, लतिका शिरसागर, साधना मोहरील, रीना गायकवाड, उज्ज्वला पाटील, स्वाती गाजरे, शीतल पाटील, सरोज अट्टार्डे व भारती रोजगाडे यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.
कार्यक्रमादरम्यान हळदी-कुंकू समारंभही पार पडला. महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू लावून मंगलमय शुभेच्छा दिल्या आणि स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला. या निमित्ताने संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि एकात्मतेचा सुंदर माहोल निर्माण झाला.
एकूणच, हा कार्यक्रम महिलांसाठी आनंद, उत्साह आणि एकात्मतेचा सुंदर संगम ठरला असून आयोजकांच्या नियोजनामुळे तो यशस्वीरीत्या पार पडला.


