भुसावळ ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश बादशहा, सचिवपदी रतन बोदडे :


भुसावळ : भुसावळ तालुका ग्रामसेवक युनियनची बैठक नुकतीच झाली. यात नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश बादशहा तर सचिवपदी रतन बोदडे यांची निवड करण्यात आली.
या निवडणूक कामी निवडणूक निरीक्षक म्हणून सी. एन. सोनवणे,
सहायक संजय भारंबे यांनी कामकाज पाहिले. यावेळी दीपक तायडे, जिल्हा उपाध्यक्ष, बी. के. पारधी, महेश सोनवणे उपस्थित होते.
अशी आहे कार्यकारिणी अध्यक्षपदी गणेश बादशहा, सचिव रतन बोदडे, मानद सचिव प्रीतम शिरतुरे, उपाध्यक्ष जगदीश इंगळे, योगीता पाटील, कोषाध्यक्ष सुबोध सोये, कांचन बादशाह, कार्याध्यक्ष जितेंद्र कढीखाये, कायदेशीर सल्लागार राहुल तायडे, लेखा परीक्षक महिपाल धुरंधर, संघटक सचिन पाटील, राहुल चौधरी प्रसिद्धी प्रमुख दिगंबर पाटील यांची निवड केली आहे.