दोषी पोलीस अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करावे- शिवसेनेचे उपजिल्हा प्रसिध्दीप्रमुख दिलीप सुरवाडे ; परभणीतील पोलीस अत्याचाराचा जाहीर निषेध !


भुसावळ- परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या हातातील संविधानाच्या प्रतीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात सोमनाथ सुर्यवंशी या विद्यार्थ्यांचा पोलीसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला आहे. या पोलीसी अत्याचाराचा जाहीर निषेध करतो आणि मुख्यमंत्र्यांनी दोषी पोलीस अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करावे अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रसिध्दीप्रमुख व मा नगरसेवक दिलीप सुरवाडे यांनी केली आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे कि, सोमनाथ सुर्यवंशी हा लॉ चा विद्यार्थी आहे. त्याने एका तरुणाला पोलीस मारहाण करीत असताना व्हिडिओ करीत होता. त्याला पोलीसांनी जबर मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
भाजपा सरकार ने संविधानाचा अवमान करणाऱ्याला कठोर शिक्षा कैली पाहिजे. या संपूर्ण बेकायदेशीर मारहाणीची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी असे म्हटले आहे.