भरधाव आयशरची अ‍ॅपेला धडक : भुसावळातील दोघे ठार – शिरपूरजवळ अपघात :मयतांमध्ये आजीसह नातीचा तर जखमींमध्ये पाच जणांचा समावेश –


भुसावळ –
मुलीला भेटण्यासाठी जाणार्‍या कुटुंबियांच्या अ‍ॅपेला मागून येणार्‍या भरधाव आयशरने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी चार वाजता मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूरजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये 60 वर्षीय महिलेसह तिच्या एक वर्षीय नातीचा समावेश आहे तर अन्य पाच जण या अपघातात जखमी झाले आहेत.
मुलीला भेटण्यासाठी जाताना अपघात
भुसावळ येथील नारायण पवार हे कुटूंबासहीत मुलीला भेटण्यासाठी ठिकरी, ता.सेंधवा येथे अ‍ॅपे (एम.पी.46 आर.0417) ने जात असताना अ‍ॅपेचा मागील टायर फुटल्यानंतर मागून येणारी भरधाव आयशर (एम.एच.18 एम.5510) ने धडक दिल्याने नारायण पवार यांच्या पत्नी प्रमिला नारायण पवार (60) व त्यांची एक वर्षाची नात तनिष्का नरेश पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर सुन शीतल नरेश पवार ( 24), नात वेदिका नरेश पवार (4) व अ‍ॅपे चालक जितेंद्र नाना देशमुख, नारायण पवार व हर्षा घोगरे हे जखमी झाले. अपघातानंतर शिरपूर पोलिसांनी धाव घेत जखमींना उपचारार्थ हलवले. हाडाखेड, ता.शिरपूर गावाजवळ हा अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *