भुसावळ बसस्थानकातील 3.20 लाखांच्या सोन्याच्या पोत चोरीचा उलगडा; महिला आरोपी अटकेत : बाजारपेठ डी बी पथकाची कारवाई:

भुसावळ, (प्रतिनिधी) — भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने बसस्थानक परिसरात घडलेल्या सोन्याच्या पोत चोरीप्रकरणी एका महिला आरोपीला अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला आहे. आरोपीकडून 3 लाख 20 हजार रुपये किमतीची 22 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी फिर्यादी कुसुम देविदास चौधरी (वय 62, रा. शिवराय नगर, मुक्ताईनगर) यांनी तक्रार दिली होती. 23 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 8.30 वाजताच्या सुमारास त्या भुसावळ बसस्थानकावर चोपडा बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून सोन्याची २२ग्राम वजनाची ३,२०,००० रुपयांची पोत लंपास केली होती.

तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 194/2026, बीएनएस 2023 कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.

तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कुलसुमबी मुस्ताक शेख (रा. यावल हिस्सा) हिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत डी.बी. पथकातील. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक जळगाव श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ विभाग श्री. केदार बारबोले तसेच पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.
तपासादरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकातील पोहेकॉ विजय नेरकर, पोहेकॉ कांतीलाल केदारे, पोहेकॉ सचिन चौधरी, पो.कॉ. महेंद्र पाटील, पो.कॉ. अक्षय कोतकर, पो.कॉ. योगेश माळी, पो.कॉ. चंद्रकांत रायपुरकर, पो.कॉ. जावेद शहा, पो.कॉ. भुषण चौधरी, पो.कॉ. अमर अवाडे, पो.कॉ. दिलीप कोळे, पो.कॉ. जिवन कापडे, पो.कॉ. हर्षल महाजन, मपोकॉ शिल्पा राठोड यांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू ठेवला होता. या कारवाईत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोहेकॉ कांतीलाल केदारे हे करत आहेत.

दरम्यान, भुसावळ बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत असून, येथे सकाळी पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

.

या