भुसावळ (प्रतिनिधी)- येथील श्री बडा हनुमान मंदिरात सीता नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे ब्रह्म मुहूर्तावर माता सितेला पंचामृत, दशमूल, उसाचा रस व विविध औषधी वनस्पतींनी अभिषेक करण्यात आला. दुपारी अभिजात मुहूर्तावर महाआरती व भजनांचे सादरीकरण या झाले.

वैशाख शुक्ल नवमीला माता सीतेचा जन्मोत्सव साजरा केला जातो. राम नवमीइतकेच सीता नवमीचेही धार्मिक महत्त्व मानले जाते. या दिवसाला जानकी नवमी असेही संबोधले जाते.
यानिमित्त मंदिर परिसर आकर्षक फुलमाळा व रोषणाईने आला होता. सजवण्यात दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महाआरतीनंतर पंजरी तसेच विविध फळांचा प्रसाद व इतर नैवेद्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा ११८ वा सप्ताह सुरू असल्याने मंदिर व परिसरात भक्तिमय वातावरण होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विमल वैष्णव, भारती वैष्णव, राणी ठाकूर, सोनम ठाकूर, भारती पाटील, पंडित जयप्रकाश शुक्ला आदींनी परिश्रम घेतले.


