भुसावळ (प्रतिनिधी )-
अप-डाऊन गोंदिया एक्स्प्रेसच्या वेळेत 1 डिसेंबरपासून काहीसा बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
गोंदिया-कोल्हापूर विशेष गाडी
अप 01040 गोंदिया-कोल्हापूर विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन पासून 08.15 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी 12.25 वाजता कोल्हापूरला पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदूरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा व चाळीसगाव, नांदगाव, मनमाड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 01039 कोल्हापूर-गोंदिया विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून 2.45 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी 6 वाजता गोंदिया येथे पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

मुंबई-गोंदिया विशेष गाडी
अप 02106 गोंदिया-मुंबई विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन पासून 2.40 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्या दिवशी 6.50 वाजता मुंबईला पोहोचणार आहे. डाऊन 02105 मुंबई-गोंदिया विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून 7.05 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्या दिवशी 11.15 वाजता गोंदियाला पोहोचणार आहे.


