भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणग्रस्तांना दोन वर्षापूर्वी बेघर करण्यात आल्यानंतर अद्यापपर्यंत त्यांचे पुर्नवसन करण्यात आले नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटातर्फे शुक्रवारी दुपारी 12 वाजता प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. या संदर्भात शुक्रवारी पदाधिकारी प्रांताधिकार्यांना निवेदन देणार आहेत . निवेदन देताना जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, रवी सपकाळे, गिरीश तायडे, बाळू सोनवणे, पप्पू सुरडकर, प्रकाश सोनवणे आदींची उपस्थिती होती.



