राजेश्वर नगरातील महिला मंडळातर्फे बाल दिवस उत्साहात साजरा

भुसावळ( प्रतिनिधी)-
येथील प्रोफेसर कॉलनी जवळील राजेश्वर नगर मधील महिला मंडळातर्फे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी बाल दिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बालगोपालांनी विविध सांस्कृतिक खेळ व बालगीते सादर करून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

मुलांच्या सुप्त कलागुणांचा विकास करणे व परंपरागत खेळांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात माझ्या मामाचे पत्र हरवले, आरिंग मीरिंग, आपडी थापडी, लपाछपी, नदी की पहाड, लंगडी, लगोरी इत्यादी खेळांचा अंतर्भाव करण्यात आला होता. योगायोगाने दिनांक 14 तारखेच्या या कार्यक्रमात एकूण 14 बालकांचा सहभाग होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळ सदस्य प्रा. डॉ. सौ. सुधा खराटे, सौ. लता कोटेचा, सौ. स्वाती चौधरी, श्रीमती कल्पना महाजन, सौ. पल्लवी पवार, डॉ. सौ. संध्या कोटेचा, स्वरा खराटे, सौ. स्नेहल महाजन व कु. वृषाली चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *