भुसावळ (प्रतिनिधी )-
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे राख वाहून येणारी पाईपलाईन हे वेल्हाळे तलावा जवळून फॉरेस्ट मध्ये तयार करण्यात आलेल्या राखेचाबंड नंबर 3 मध्ये पाईपलाईन सोडली जाते वेल्हाळे तलावापासून तर राखेचा बँड नंबर तीन पर्यंत चढ-उतार असल्यामुळे पाईप लाईन बंद झाल्यावर मोठ्या प्रमाणात चोकप होते त्यामुळे पुन्हा सुरू झाल्यानंतर राग मिश्रित पाणी पुढे जात नाही ते पुढे जाण्यासाठी ज्या ठिकाणी पाईपलाईन चोकअप झालेले असेल त्या ठिकाणी ठेकेदारामार्फत गॅस कटरने सदरची पाईपलाईन कट करून पाणी सोडून चोकअप झालेली पाईपतील राख बाहेर काढली जाते सदरचा प्रकार हा ठीक ठिकाणी काही अंतराने नेहमी होतो सदरचे चौकट हे ज्या ठिकाणी जमिनीवर पाईप लाईनला नैसर्गिक उतार आहे नैसर्गिक प्रवाहामुळे पाणी वाहून जाते अशा ठिकाणी काढले जातात त्यामुळे सदरचे राख मिश्रित पाणी हे वेल्हाळे तलावात येऊन जमा होते असा हा प्रकार मागील दहा ते पंधरा वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर ठेकेदाराकडून केला जात आहे सदरचा प्रकार होऊ नये म्हणून संस्थेमार्फत दिपनगर प्रशासनाला वेळोवेळी आंदोलन करून निवेदने दिली आहेत सदर निवेदनांवर ती प्रशासनातर्फे आजपर्यंत आठ ते दहा वेळा लेखी आश्वासने देऊन काही मोजकी काम काम करण्यात आली तीही काही ठराविक मुख्य अभियंता मार्फतच झाली नंतर मात्र या प्रकारामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून दिपनगर प्रशासनाने बघून न बघितल्यासारखे केले आहे यामुळे वेल्हाळे परिसरातील छोटे छोटे नाले व मुख्य प्रवाहातील दोन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाईपलाईन फुटून वाहत आलेली राख जमा झालेली आहे सदर प्रश्न भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे व माजी महसूल मंत्री एकनाथ रावजी खडसे यांनीसुद्धा औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर यांना याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या तरीसुद्धा आज पर्यंत औष्णिक विद्युत केंद्रामार्फत होणाऱ्या प्रदूषणावर कोणताही ठोस उपाय योजना केला जात नसून त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीचे प्रायोजन नाही परिसरात ठेकेदारामार्फत होणाऱ्या प्रदूषणास प्रदूषण मंडळामार्फत मागील वर्षी तात्काळ उपाययोजना करण्याचे उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत
ठेकेदाराकडून व व विद्युत केंद्राकडून नुकसान भरपाई करणार वसूलीचे अरमन
संस्थेने 2016 – 17 मध्ये 30 लक्ष मत्स्यबीज वडाळे तलावात सोडले होते या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर वेल्हाळे तलावात राग मिश्रित पाणी येऊन सदर मत्स्यबीज हे मृत्यूमुखी पडले व यावर्षी सुद्धा संस्थेने वेल्हाळे तलावात पंचावन्न लक्ष मच्छ बीज व चार लक्ष कोळंबी (झिंगा) सोडला असून सदर सदर बियाण्यापासून संस्थेला लाखो रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे ठेकेदारामार्फत पाईपलाईन लिकेज होण्याच्या व व चोकप काढण्याच्या काम बंद न झाल्यास स्वच्छतेचे होणारे नुकसान संबंधित ठेकेदाराकडून वसूल केले जाईल कारण विद्युत केंद्रामार्फत राग हाताळणी पाईपलाईनचे काम संबंधित ठेकेदाराचे असून त्याचा त्यांना कोट्यावधी रुपये मोबदला मिळतो असे असताना सुद्धा संबंधित बाबीकडे ठेकेदारामार्फत दुर्लक्ष करून परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण केले जात आहे असे संस्थेचे चेअरमन सोनवणे यांनी सांगितले
वेल्हाळे परिसरात होणाऱ्या दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ,व राज्याचे पर्यावरण मंत्री ना.आदित्य उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असून न्याय मागण्यात येऊन संबंधितांचे चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही शिवसेना भुसावळ विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख संतोष सोनवणे यांनी कळविले आहे.



