ॲड. जास्वंदी भंडारी यांची सचिव पदी नियुक्ती


भुसावळ (प्रतिनिधी )-
शासनमान्य ग्राहक कल्याण फाऊंडेशन जिल्हा सचिव पदी भुसावळ येथील ॲड.जास्वंदी एन भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली.
जळगाव जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर यांनी अमळनेर येथे झालेल्या बैठकीत ही नियुक्ती केली , सचिव जास्वंदी भंडारी यांनी यापुढे आपल्या पदाचा पूर्ण मान राखत ग्राहकांच्या हितासाठी कार्य करेल अशी ग्वाही दिली.
महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्य विकास महाजन ( जळगाव) ग्राहक कल्याण फाऊंडेशन प्रदेश अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर प्रदेशइ उपाध्यक्ष रामचंद्र तांबे प्रदेश कार्यवाहक सतिश साकोरे आदींनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *