भुसावळ शहरातील रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबाराची अफवा ?

भुसावळ- शहरातील रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबार झाल्याची अफवा पसरल्याने7 घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत पोहचून परिसराची पाहणी केली
यावेळी प्रामुख्याने नगरसेवक स्व. रविन्द्र खरात यांची पत्नी रजनी रविंद्र खरात यांची समक्ष भेट घेऊन तुमचा मुलगा कोठे आहे ? याबाबत विचारणा केली असता रजनी खरात यांनी माझा मुलगा औरंगाबाद येथे असल्याची माहिती दिली.अधिकाऱ्यांनी रजनी खरात यांना मुलाला फोन लावण्यास सांगितले असता फोन बंद असल्याचे रजनी खरात यांनी सांगितले.या घटनेची शहानिशा करण्यासाठी शहर पोलीस स्टेशन हद्दीत संशयास्पद परिसराची पाहणी केली.तसेच भुसावळ शहरातील हॉस्पिटल व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय मध्ये कुणी इसम उपचार घेण्यासाठी किंवा जखमी अवस्थेत आल्याबाबत तपासणी केली.तसेच ज्या परिसरात गोळीबार झाल्याची गोपनीय माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली त्या परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीन तास कसून चौकशी केली.
या दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या हाती कुठलीही माहिती लागली नसल्याने शहरात या भागात खरच गोळीबार झाला की अफवा आहे हे नेमके गुलदस्तात आहे ?
या प्रकरणी स्वत: पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे घटनेचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *