भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष उत्सव ट्रेन चालविणार आहे. सणासुदीच्या हंगामात प्रवाशांची होणारी संभाव्य अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी सध्याच्या विशेष उत्सव ट्रेनची वारंवारता वाढवून दररोज चालविण्यात येईल.
तपशील खाली दिलेल्या माहितीनुसारः

१) लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष साप्ताहिक उत्सव (3 फे-या)
01079 विशेष उत्सव दि. १२.११.२०२० ते २६.११.२०२० पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर गुरुवारी सुटेल आणि गोरखपूरला तिसर्या दिवशी पोहोचेल.
01080 विशेष उत्सव दि. १४.११.२०२० ते २८.११.२०२० पर्यंत गोरखपूर येथून दर शनिवारी सुटेल आणि दुसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे : हरदा आणि भोपाळ वगळता नियमित ट्रेन क्रमांक 11079/11080 सारखेच असतील.
संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, ३ द्वितीय आसन श्रेणी.
२) लोकमान्य टिळक टर्मिनस – मंडुआडीह विशेष उत्सव विशेष गाडी ही द्वि-साप्ताहिक ऐवजी दररोज धावणार
02167 विशेष उत्सव दि. १०.११.२०२० ते ३०.११.२०२० पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज सुटेल आणि मंडुआडीह येथे दुसर्या दिवशी पोहोचेल.
02168 विशेष उत्सव दि. ११.११.२०२० ते १.१२.२०२० पर्यंत मंडुआडीह येथून दररोज प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आगमन होईल.
थांबे आणि संरचना: खंडवा ,भुसावळ, नाशिक , कोणताही बदल नाही.
आरक्षण : ०१०७९ या संपूर्णतः आरक्षित विशेष उत्सवचे विशेष शुल्कासह आरक्षण दि. ९.११.२०२० पासून सुरू होईल आणि ०२१६७ उत्सव विशेष गाडीच्या वाढीव वारंवारतेसाठी दि. ८.११.२०२० पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in. या वेबसाइटवर सुरू होईल.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी आहे.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


