चाळीसगावात चार लाखांचे भेसळयुक्त तेल जप्त ; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई :



चाळीसगाव –
दिवाळीत तेलाला मोठी मागणी असल्याची संधी साधून भेसळयुक्त तेल चाळीसगावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगावच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकत स्टेशन रोडवरील मे. राजकुमार माणिकचंद अग्रवाल यांच्या दुकानातून तीन लाख 93 हजार 310 रुपये किंमतीचे तेल जप्त केले. हे तेल भेसळयुक्त असल्याचा या विभागाला संशय आहे.
तेल भेसळयुक्त असल्याचा संशय
स्टेशन रोडवरील मे.राजकुमार माणिकचंद अग्रवाल यांच्या दुकानावर अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांच्यासह पथकाने धाड टाकून तेल साठ्याची तपासणी केली. त्यात रीफाईंड सोयाबीन तेलाचे नमूने घेण्यात आले तसेच 15 लिटरचे 49 कॅन्स व 16 बॅरेल प्रत्येक 180 किलो असा एकूण तीन लाख 93 हजार 310 रुपये किंमतीचा तेलाचा साठा भेसळयुक्त असल्याच्या संशयातून जप्त करण्यात आले. दरम्यान,
नागरीकांनी दिवाळी मिठाई घेताना पारखून घ्यावी तसेच पॅकबंद पदार्थांची खरेदी करताना विक्रेत्यांकडून पक्के बिल घ्यावे या आवाहनासह , जिल्ह्यातील मिठाई दुकानांसह दुध डेअरी व दुकानांची सुद्धा अचानक तपासणी होणार
असेही अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यो.कों.बेंडकुळे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *