भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील संशोधन व विकास समिती तर्फे दि. 6 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता डॉ. दिपक दलाल, कबची उमवि जळगाव यांचे व्याख्यान संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. ब-हाटे तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. एन.ई. भंगाळे, प्रा. ई. जी. नेहेते, प्रा. एस. एन. नेहेते, प्रा. वाय, के. चौधरी संशोधन व विकास समिती प्रमुख डॉ. सचिन येवले यांची होती. डॉ. दलाल यांनी संशोधन हे कसे वैयक्तिक आणि सांघिक प्रगतीसाठी कसे उपयोगाचेआहे याबद्दल मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी संशोधनातील विविध महत्त्वाचे मुद्दे इम्पॅक्ट फैक्टर, एच इंडेक्स आदींबद्दल माहिती दिली. त्याबद्दल बोलतांना त्यांनी त्यांच्या उगमापासूनचा प्रवास वर्णन केला. तसेच त्यांनी संशोधन पेपर प्रकाशीत करण्यासाठी UGC ने दिलेल्या शेती व अटींबद्दल तसेच UGC care लिस्ट बद्दल सविस्तर वर्णन केले. त्यांच्या व्याख्यानात त्यांनी प्राध्यापकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संशोधन कसे उपयुक्त आहे हे वर्णन केले, त्यासाठी प्रत्येक प्राध्यापकाने दरवर्षी एकतरी संशोधन पेपर प्रकाशित केला पाहिजे. सूत्रसंचालन वृषाली कोल्हे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. के. के. अहिरे, प्रा. डॉ. डी. के. हिवराळे, प्रा. डॉ. रश्मी शर्मा, प्रा. डॉ. किरण वारके, प्रा. एम. जे. जाधव, प्रा. डॉ. उमेश फेगडे तसेच रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक वृंद यांनी सहकार्य केले.

