गुजरात येथील महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेषणास जिल्हयातील भाजप पदाधिकारी जाणार

भुुसावळ दी 18 (प्रतीनिधी )- भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनास अहमदाबाद – गुजरात येथे आयोजित भाजपा महिला मोर्चा चे राष्ट्रीय अधिवेशन येत्या 21 व 22 डिसेबर रोजी आयोजित करण्यात आले आहे .यामध्ये भारतीय जनता पार्टिचे आगामी धोरण आखण्यात येणार असून तब्बल 10 वर्षानंतर हे अधिवेशन होत आहे , या अधिवेशनात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे .या अधिवेषणाला संपूर्ण देशातुन जवळपास 20 हजार महिला कार्यकर्त्यां सहभागी होणार आहे . याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या जळगाव जिल्हा (ग्रामीण ) च्या महिला मोर्चा च्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी सौ.शैलजा पाटील -जिल्हा अध्यक्षा , सौ.लता चौधरी- उपाध्यक्षा , सौ‌.सुरेखा मोहरीर -जिल्हा सरचिटणीस , सौ.बेबीताई भुसारी- उपाध्यक्षा, या दि.२० डिसेंबर रोजी दु.४:३०वा.रवाना होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *