भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आक्रोश मोर्चाने शहर दणाणले: प्रांत कार्यालयावर तीव्र निदर्शने :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ पालिकेच्या सर्व प्रलंबित विषयांवर भाजपचा विरोध अपंग, निराधार असतील किंवा शहरातील रस्ते, स्वच्छता, जल व्यवस्थापन आदी महत्त्वाच्या विषयांना देखील विरोध … एकी कडे भाजप आपला पक्ष स्थापना दिवस ऊत्साहात साजरा होत असताना दुसरी कडे याच भाजपच्या कृतीचा निषेध म्हणून शहरात आक्रोश मोर्चा काढला गेला.

भुसावळकरांना न्याय मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्व नगरसेवकांनी आज ६ एप्रिल रोजी गांधी पुतळ्यापासून प्रांत कार्यालयापर्यंत भव्य आक्रोश मोर्चा काढला. दादागिरी नही चलेगी, नही चलेगी भुसावळ चा विकास हा झालाच पाहिजे अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. हा मोर्चा प्रांत कार्यालयावर येऊन धडकला. यामध्ये तृतीयपंथी,अपंग व शहरातील अन्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. प्रांत कार्यालयात आल्यानंतर या ठिकाणी मोर्चेकरांनी प्रांतांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलं.

बराच वेळ हे आंदोलन झाल्यानंतर जिल्हाधिकारींनी या ठिकाणी यावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मोर्चेकरांनी केली मात्र प्रांत अधिकारी या ठिकाणी हजर नसल्याने हा मोर्चा या ठिकाणी विसर्जित करण्यात आला.आपल्या अडचणी व मागण्या वरिष्ठा पर्यंत पोहचवितो अशी भुमिका प्रशासनाने घेतल्याने तुर्त आंदोलन स्थगित करण्यात आले.