अंनिस भुसावळ शाखेची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी डॉ.सुभाष लोखंडे, सचिवपदी निरंजना तायडे

भुसावळ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) भुसावळ शाखेची बैठक अध्यक्ष सुमंगल अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बावस्कर व अॅड. सागर बहिरूणे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत सर्वानुमते सन २०२६ साठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

यावेळी नगरसेवक उल्हास पगारे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बावस्कर यांनी अंनिस कार्यकर्त्यांनी राजकीय असहकाराला न घाबरता धैर्याने कार्य करावे, असे सांगितले. वाढत्या अंधश्रद्धेला आळा घालणे हे मोठे आव्हान असून कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज असल्याचे मत अध्यक्ष सुमंगल अहिरे यांनी व्यक्त केले. डॉ. सुभाष लोखंडे यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

निवड झालेल्या नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉ. सुभाष लोखंडे, उपाध्यक्षपदी विजय साळवे व सिद्धार्थ सोनावणे, कार्याध्यक्षपदी शांताराम जाधव, प्रधान सचिवपदी निरंजना तायडे, प्रसिद्धी प्रमुखपदी नरेश वाघ यांची निवड करण्यात आली. महिला प्रतिनिधी म्हणून अंजना निरभवणे, आनंद छापळणे, नरहरी वासनिक व राजेश तायडे यांचा समावेश आहे. तर बुवाबाजी संघर्ष कार्यवाहपदी अरुण दामोदर, एम. झेड. गवई, एम. आर. धनविजय व किसन आ. तायडे यांची निवड करण्यात आली.