अकलूद येथे शिवमहापुराण कथेत पं. प्रदीप मिश्रा यांचा गांधी टोपीने सत्कार

.

भुसावळ (प्रतिनिधी) – जवळील अकलूद शिवारात सुरू असलेल्या पं. प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत. शुक्रवारी कथेचा चौथा दिवस पार पडला. या दिवशी पं. मिश्रा यांच्या डोक्यावर परिधान केलेली गांधी टोपी विशेष लक्षवेधी ठरली.

स्थानिक संत आणि मान्यवरांच्या हस्ते पं. मिश्रा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे प्रतीक मानली जाणारी गांधी टोपी त्यांना भेट देत सन्मानित करण्यात आले. गांधी टोपी परिधान करून पं. मिश्रा यांनी उपस्थित भाविकांना शिवमहापुराणातील विविध प्रसंगांचे रसाळ विवेचन केले.

कथास्थळी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून आली होती. परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, शिवनामाच्या गजरात कथा सुरू आहे. स्थानिक संत, आयोजक आणि भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडत आहे.