बोदवड येथे संताजी महिला प्रतिष्ठानच्यावतीने १५ मार्च रोजी महिला मेळाव्याचे आयोजन:

भुसावळ (प्रतिनिधी ) : संताजी महाराज तेली समाज बहुउद्देशीय सेवा संस्था, बोदवड संचलित संताजी महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत बळीराजा मंगल कार्यालय, जामठी रोड, बोदवड येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अॅड. जास्वंदीताई भंडारी (भुसावळ) उपस्थित राहणार आहेत.

महिला सक्षमीकरण, समाजातील महिलांचे योगदान आणि विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला असून परिसरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ललिता चौधरी व ममता चौधरी यांनी केले आहे.