भुसावळ डीआरएम कार्यालयात 15 डिसेंबरला विभागीय पेंशन अदालत –

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ डीआरएम कार्यालयात पेंशन अदालत (द्वितीय) 2025 चे आयोजन सोमवार, 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्‍यांच्या पेन्शन व सेटलमेंट संबंधित तक्रारींचे जलद व सुसंगत निवारण करण्याच्या उद्देशाने पेन्शन अदालत होत आहे.

जागेवर होणार तक्रारींचे निरसन
पेंशन धारकांच्या तक्रारींचे तत्परतेने निराकरण केले जाईल. पेन्शन अदालतीत केवळ पेन्शनशी संबंधित प्रकरणेच घेतली जातील (पॉलिसी बाबींचा समावेश असलेली तक्रार (उदा. कौटुंबिक पेन्शन प्रकरणे, नाव समाविष्ट प्रकरणे इ.), कायदेशीर मुद्दे (न्यायालयातील प्रकरणे) पेन्शन अदालतमध्ये घेता येणार नाहीत.

भुसावळ विभागातून निवृत्त झालेले व पेन्शन/सेटलमेंट संदर्भात तक्रारी असलेले कर्मचारी आपल्या तक्रारींचे अर्ज तीन प्रतीत विभागीय रेल्वे व्यवस्थापक (कार्मिक), भुसावळ यांना सादर करू शकतात.अर्जात आपले नाव, पद, भरती तारीख, बँक खाते क्रमांक, बँक आणि आपल्या तक्रारींचे स्वरूप आदी नमुद करवे व अर्जासोबत पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ), बँकेच्या पेन्शन स्लिपची, पास बुकची झेरॉक्स तसेच आवश्यक दस्तावेज जोडावी.विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, भुसावळच्या मुख्य प्रवेशद्वारावरील ड्रॉप बॉक्समध्ये अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत ही 31 ऑक्टोबर आहे.