अमरावती जिल्ह्यात तीन दिवसीय नशाबंदी मंडळाच्या संघटकांची संवाद, समन्वय व वार्षिक नियोजन बैठक संपन्न


 भुसावळा (प्रतिनिधी ) -  नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत व्यसनमुक्ती वर कार्य करणारी शासनमान्य संस्था आहे. गेल्या  ६७ वर्षांपासून ही संस्था राज्यभर कार्यरत असून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये संस्थेचे प्रचार, प्रसार, प्रबोधनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्य सुरू आहे. राज्याभरातील प्रत्येक जिल्याच्या  संघटकाच्या संवाद, समन्वय आणि वार्षिक नियोजन बैठकीचे आयोजन शुक्रवार १३ जून ते १५ जून पर्यंत प्रयास, सेवाकुंर भवन दस्तुरनगर रोड,  विमलनगर, फरशी फाटा, तालुका जिल्हा अमरावती या ठिकाणी करण्यात आले होते. या ठिकाणी     
   राज्यातील सर्व संघटकाना वर्ष २०२५-२६ साठी मान्यता देण्यात आली.  तसेच वर्षभरात संघटकांच्या कार्याचे नियोजन करण्यात आले. सर्व संघटकांना सामाजिक प्रबोधन कार्यासाठी पोस्टर, प्रत्रक, महामानवाच्या विचारांचे पुस्तक, व्यसनमुक्ती वरील सापशिडी असे साहित्य नशाबंदी मंडळाच्या वतीने देण्यात आले.     
   यावेळी राज्यस्तरीय संघटक बैठकीचे उद्घाटन *प्रयास* संस्था चे अध्यक्ष डॉ. अविनाश सावजी, नशाबंदी मंडळाचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुख्य संघटक चिटणीस अमोल मडामे, चिटणीस चंद्रकांत चौधरी, सदस्य बॉस्को डिसुझा यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी महाराष्ट्रातून ३६ जिल्ह्यातील संघटक,  ७ विभागांचे विभागीय संघटक, नशाबंदी मंडळाचे कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. यावेळी *प्रत्येक जिल्ह्यात किमान 10 शाळा तंबाखूमुक्त करण्याचा व प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्स फ्री जिल्हा अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला.* अशी माहिती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे नाशिक विभागीय संघटक प्रा डॉ दयाघन राणे यांनी दिली आहे.
फोटो ओळ - प्रा डॉ दयाघन राणे यांना जळगाव जिल्हा संघटक म्हणून मान्यता प्रमाणपत्र देत असताना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस तसेच मुख्य संघटक श्री अमोल मडामे, चिटणीस श्री चंद्रकांत चौधरी, व्यवस्थापन सदस्य श्री बॉस्को डिसुझा आणि मंडळाचे पदाधिकारी श्री बिस्मिल्ला सय्यद.