भुसावळातील रेल्वे सुरक्षा बलाची सतर्कता : घरातील वादातून पळालेल्या पाच बहिणींना कुटूंबाकडे सोपवले –

भुसावळ () – घरात वडीलांनी रागावल्यानंतर वाद झाला आणि घर सोडून निघालेल्या 7 ते 20 वयोगटातील पाच सख्या बहिणी रविवारी सकाळी 7.40 वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर संशयास्पद स्थितीत बसलेल्या ड्युटीवर असलेले आरपीएफ आशीष यादव यांना दिसल्या . यादव यांनी तत्काळ या मुलींशी संवाद साधला, तुमच्यासोबत कोण आहे, कोठून आलात याची चौकशी करीत त्यांना आरपीएफ ठाण्यात आणले.
पाचही मुलींना आरपीएफ ठाण्यात आणून त्यांच्याशी संवाद साधला यावेळी महिला कर्मचारी सरला वाल्दे यांच्या उपस्थितीत चौकशी केली असता, त्या सर्व बहिणी बांदा (उत्तर प्रदेश) येथील असल्याचे स्पष्ट झाले.
त्यांनी सांगितले की, घरात वडिलांशी झालेल्या वादानंतर त्या पळून गेल्या. वापी (गुजरात) येथील त्यांच्या चुलत काकाकडे जाण्याचा त्यांचा बेत होता. हे ऐकून उपस्थित सर्वांची मने पिळवटून गेली. यावेळी आरपीएफ अधिकारी, कर्मचारी यांनी या मुलींना पाणी, चहा, नाश्ता दिला. त्या मुली घाबरलेल्या होत्या त्यांना धीर दिला. यावेळी आरपीएफ अधिकारी यांनी तत्काळ त्यांच्या वडिलांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. संबंधित पोलीस ठाण्यात 14 जून रोजी मुली बेपत्ता असल्याची तक्रारही पालकांनी दाखल केली आहे. आरपीएफच्या सतर्कतेमुळे आणि आधार बहुउद्देशीय संस्थेच्या प्रकल्प समन्वयक सुनील व दीपाली हिवाळे यांच्या मदतीने या मुलींना बाल कल्याण समिती जळगाव आणि आशादीप महिला वस्तीगृह, जळगाव येथे सुरक्षिततेने सुपूर्द करण्यात आले.
एकाच कुटुंबातील असलेल्या पाचही बहीणी या वडील रागविल्याने घर सोडून काकांकडे गुजराथमध्ये वलसाड येथे जात होते, मात्र, रविवारी सकाळी 7.40 पाचही बहिणींची स्टेशनवर बसलेल्या दिसल्यात यात 1. ईशा (वय 7), गुढिया (वय 11), आरती (वय 12), काजल (वय 16) आणि रिता (वय 20) या मुली आरपीएफला बसलेल्या दिसल्यात आणि त्या पळून जात असल्याचे समोर आले.
रेल्वेने आतापर्यंत फक्त प्रवासी पोचविण्याचे काम केले नाही तर पाच निराश मुलींना पुन्हा त्यांच्या मायेच्या घरट्यात परत नेले आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवान व अधिकार्‍यांनी केलेले काम खरच कौतुकास्पद आहे. या मुली पुन्हा त्याच्या पालकांना मिळणार असल्याचा आनंद असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी म्हणाले.