भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रवाशांची अतिरीक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे उत्सव विशेष उत्सव गाड्यांच्या फेर्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्णपणे आरक्षित असलेल्या या गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जाणार असून कोविड नियमांचे पालन कप्रवाशांना करावे लागणार आहे.
जबलपूर-पुणे एक्स्प्रेस
अप 02132 जबलपूर ते पुणे एक्स्प्रेस 28 डिसेंबरपासून दर सोमवारी प्रस्थान स्टेशनपासून रवाना होईल तर डाऊन 02131 पुणे ते जबलपूर एक्स्प्रेस 29 डिसेंबरपर्यंत दर मंगळवारी प्रस्थान स्टेशन पासून रवाना होईल. या गाडीला खंडवा, भुसावळ व मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

जबलपूर ते कोईम्बतूर एक्स्प्रेस
अप 02198 जबलपूर ते कोईम्बतूर एक्सप्रेस 26 डिसेंबरपर्यंत दर शनिवारी प्रस्थान स्टेशनपासून रवाना होईल तर डाऊन 02197 डाउन कोईम्बतूर ते जबलपूर ही गाडी 28 डिसेंबरपर्यंत दर सोमवारी प्रस्थान स्टेशनपासून रवाना होईल. या खंडवा, भुसावळ व नाशिक रोड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


