अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी सचिन संतोष चौधरी यांची निवड


भुसावळ (प्रतिनिधी )-
राज्याचे अन्न सुरक्षामंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक ना. छगनराव भुजबळ यांच्या आदेशाने ही निवड शनिवार 21 रोजी जळगाव येथे करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय महात्मा समता परिषदचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, समन्वयक अनिल नाडे, जळगांव जिल्हा पश्चिमचे जिल्हाध्यक्ष श्री. सतीश महाजन सर, कार्याध्यक्ष श्री.वसंत माळी, समता परिषदचे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक शालीग्राम मालकर, माजी आमदार हरिभाऊ महाजन, बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विवेक ठाकरे, मुकुंद सपकाळे, माळी महासंघाचे विभागीय प्रकाश महाजन, जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, महानगरपालिकेच्या नगरसेविका सरिता नेरकर यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सचिन चौधरी यांनी आगामी काळात समता परिषदच्या माध्यमातून जनसामान्य माणसांना न्याय देण्याचे काम आगामी काळात करू असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *